पंतप्रधान पदासाठी आपणच योग्य उमेदवार असल्याचा दावा करत उत्तर प्रदेशातील मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी अप्रत्यक्षपणे पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांचीच गोची केली आहे. कानपूर येथे बोलत असताना आझम खान यांनी पंतप्रधान होण्याची आपली इच्छा व्यक्त करून दाखवली. मुलायम यांचाही आपल्याला पाठिंबा राहिल, असा दावा देखील केला.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यास आणि सर्व खासदारांनी पंतप्रधानपदी माझी निवड केल्यास देशात चांगला संदेश जाईल. देश दिवसेंदिवस प्रगती करेल. एवढेच नाही तर वेळ येईल तेव्हा मुलायम सिंह हेच पंतप्रधान पदासाठी स्वत:हून माझे नाव सुचवतील, असे आझम खान म्हणाले.
आझम खान यांना उत्तरप्रदेशच्या उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी करणारे पोस्टर्स लखनऊमध्ये झळकत असल्याबाबत प्रश्न विचारला असता आझम खान यांनी उपमुख्यमंत्री नाही तर आपण पंतप्रधान होण्याच्या लायक असल्याचे सांगितले. त्यामुळे मीच ते पोस्टर्स उतरविण्यास देखील सांगितले, असेही आझम खान म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am fittest person to become pm says azam khan