गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्वत:ची तुलना सचिन तेंडुलकरबरोबर केली. विधानसभेत विरोधकांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना  
पर्रिकर म्हणाले की, “मी माजी क्रिकेटपटू सलिम दुर्रानी यांच्यासारखा नाही की, जो चाहत्यांच्या मागणीनुसार षटकार मारत असे. मी सचिन तेंडुलकर सारखा आहे की, ज्याचे लक्ष केवळ चेंडुवरच असते आणि योग्यवेळी चेंडू तडीपार केला जातो.”
विरोधकांनी कोळशाच्या खाणींच्या गैरव्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित केले असता “कायद्याप्रमाणे नियमपाळून गैरव्यवहारातील पैसा वसूल केला जाईल. पण प्रथम यामागचे गुन्हेगार मला शोधून काढावे लागतील” असेही पर्रिकर म्हणाले

Story img Loader