काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या सभेत विधान केल्याने वादाला तोंड फुटले. खर्गे यांनी स्वतःची तुलना ज्योतिर्लिंगाशी केली. खरगे म्हणाले, “मी हिंदू आहे, माझे नाव मल्लिकार्जुन खरगे आहे, मी लिंग आहे, १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. माझ्या वडिलांनी माझे असे नाव ठेवले आहे.” खरगे यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्याने तीव्र निषेध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा नेते शेहजाद पूनावाला यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे की, ‘हिंदू धर्माचा अपमान करणे ही काँग्रेस पक्षाची ओळख आहे. काँग्रेसने आधी श्रीरामाचा अपमान केला. काँग्रेसने श्री राम लला यांच्या अभिषेकासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नृत्य आणि गाणे म्हटले होते. काँग्रेसवाले श्रीरामाच्या अस्तित्वावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे भगवान शिवाचा अपमान करत आहेत. खर्गे यांनी स्वतःची तुलना १२ ज्योतिर्लिंगांशी केली आहे.

हिंदू समाजाचा मोठा अपमान!

ते पुढे म्हणाले, “मला विचारायचे आहे की काँग्रेस इतर कोणत्याही धर्माबद्दल अशी टिप्पणी करू शकते का? व्होटबँकेसाठी काँग्रेसची पातळी इतकी घसरली आहे की, हिंदूंच्या श्रद्धा दुखावण्याचे काम सातत्याने केले जात आहे. काँग्रेस अध्यक्षांनी माफी मागावी. जर नाव शिव असेल तर तुम्ही भगवान शिव होऊ शकत नाही. कोट्यवधी लोकांची ज्योतिर्लिंगावर श्रद्धा आहे आणि हे स्वतःला ज्योतिर्लिंग म्हणवून घेत आहेत. हा हिंदू समाजाचा मोठा अपमान आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am one of the sacred 12 jyotirlinga says mallikarjun kharge bjp responds sgk