भारतीय अर्थव्यवस्था सध्या कठीण परिस्थितीतून जात असून, ती पुन्हा रुळावर आणण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजले जातील, असा विश्वास पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी उद्योजकांची संघटना असलेल्या ‘असोचॅम’च्या सर्वसाधारण सभेमध्ये व्यक्त केला.
रुपयाचे अवमूल्यन, चालू खात्यातील वाढती तूट आणि जागतिक आर्थिक परिस्थिती या सगळ्या आव्हानांचा पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये उहापोह केला. देशातील वाढती महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया प्रयत्न करीत असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, या स्थितीत कोणत्याही उद्योजकाने नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली येऊ नये. जगातील वेगवेगळे देश सध्या कठीण आर्थिक परिस्थितीतून जात आहेत. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारने उपाय योजले पाहिजेत, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. उद्योजकांची भावना रास्त आहे आणि सध्या आम्ही त्यालाच प्राधान्य दिले आहे.
जेव्हा सर्वकाही सुरळीतपणे चालू असते, त्यावेळी सरकारचा हस्तक्षेप खूप कमी असतो. मात्र, ज्यावेळी कोणतीही कठीण परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी सरकारला स्वतःहून काही निर्णय घ्यावे लागतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
उद्योजकांनो, नकारात्मक विचार करू नका – पंतप्रधानांचे आवाहन
भारतीय अर्थव्यवस्था सध्या कठीण परिस्थितीतून जात असून, ती पुन्हा रुळावर आणण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजले जातील, असा विश्वास पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी उद्योजकांची संघटना असलेल्या 'असोचॅम'च्या सर्वसाधारण सभेमध्ये व्यक्त केला.
First published on: 19-07-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I appeal to each one of you not to be overcome by negative sentiment says manmohan singh