भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित असलेले पक्षाचे प्रमुख नेते यशवंत सिन्हा यांनी आपल्याला ‘नमोनिया’ झाला नसल्याचे जाहीर केले आहे. आपण दुसरया काही कारणांमुळे गोवा येथे सुरू असलेल्या बैठकीला हजरनसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
“मला ‘नमोनिया’ झाला नसून माझे आरोग्य चांगले आहे. परंतू इतर काही कारणांमुळे मी या बैठकीला हजर राहीलो नाही.”, असे सिन्हा म्हणाले.
पक्षाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसह यशवंत सिन्हा, जसवंत सिंग, उमा भारती, योगी आदित्यनाथ व शत्रुघ्न सिन्हा हे दिग्गज या बैठकीपासून लांब राहिले आहेत. सिन्हा यांनी सुरूवातीला मोदींच्या २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूक मोहिमेच्या प्रचार प्रमुख पदाला पाठींबा दिला होता.
मला ‘नमोनिया’ झाला नाही- यशवंत सिन्हा
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित असलेले पक्षाचे प्रमुख नेते य़शवंत सिन्हा यांनी आपल्याला 'नमोनिया' झाला नसल्याचे जाहीर केले आहे. आपण दुसरया काही कारणांमुळे गोवा येथे सुरू असलेल्या बैठकीला हजरनसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
First published on: 08-06-2013 at 03:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I dont have namonia yashwant sinha on skipping bjp meet