भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित असलेले पक्षाचे प्रमुख नेते यशवंत सिन्हा यांनी आपल्याला ‘नमोनिया’ झाला नसल्याचे जाहीर केले आहे. आपण दुसरया काही कारणांमुळे गोवा येथे सुरू असलेल्या बैठकीला हजरनसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
“मला ‘नमोनिया’ झाला नसून माझे आरोग्य चांगले आहे. परंतू इतर काही कारणांमुळे मी या बैठकीला हजर राहीलो नाही.”, असे सिन्हा म्हणाले.
पक्षाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींसह यशवंत सिन्हा, जसवंत सिंग, उमा भारती, योगी आदित्यनाथ व शत्रुघ्न सिन्हा हे दिग्गज या बैठकीपासून लांब राहिले आहेत. सिन्हा यांनी सुरूवातीला मोदींच्या २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूक मोहिमेच्या प्रचार प्रमुख पदाला पाठींबा दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा