अॅलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी यूलिया यांनी त्यांची पहिली इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी आय लव्ह यू असं म्हटलं आहे. तसंच दोघांचा एकत्र असलेला फोटोही शेअर केला आहे. या फोटोत दोघंही बरोबर दिसत आहेत. अॅलेक्सी नवाल्नी हे पत्नीच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे सर्वात प्रभावी विरोधक, अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झाल्याचे तेथील तुरुंगाधिकाऱ्यांनी जाहीर केलं. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या आईला देण्यात आली. या घटनेनंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. नवाल्नी यांची ही हत्या असेल, तर राजकीय विरोधकांना नामशेष करण्याच्या पुतिन यांनी सुरू केलेल्या सूडसत्रातील ही आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची हत्या आहे असं म्हणता येईल.
अलेक्सी नवाल्नी कोण होते?
पेशाने वकील असलेले नवाल्नी सत्ताधाऱ्यांमध्ये फोफावलेल्या भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आवाज उठवत राहिले. २०००च्या दशकात राष्ट्रवादी मोर्चामध्ये त्यांनी भाग घेतला. स्थलांतरावर निर्बंध आणावेत, यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यांच्या या राष्ट्रवादी विचारसरणीमुळे उदारमतवादी याब्लोको या विरोधी पक्षातून त्यांची हकालपट्टी झाली. त्यानंतरही ते पुतिन यांच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेला भ्रष्टाचार, त्यांची विलासी जीवनशैली यावर आवाज उठवत राहिले. आपल्या ब्लॉग्जमधून त्यांनी पुतिनधार्जिण्या उच्चभ्रूंवर टीकेची झोड उठविली. २०११ साली झालेल्या निवडणुकीत फसवणुकीने पुतिन विजयी झाल्याचा आरोप करून रशियाभर निदर्शने झाली. त्यावेळी सुरुवातीलाच अटक करण्यात आलेल्यांपैकी नवाल्नी एक होते.
हे पण वाचा- अग्रलेख: मौनाचे मोल!
पुतिन यांच्या एककल्ली कारभारामुळे रशियामध्ये पुन्हा क्रांती होईल, असे भाकीत वर्तवणारे नवाल्नी पुतिन यांच्या घशातला काटा बनले नसते, तरच नवल. सायबेरिया येथे कथितरित्या विषप्रयोग झाल्यानंतर त्यांच्यावर जर्मनीमध्ये उपचार केले गेले. २०२१ मध्ये ते विपरीत परिस्थितीत मायदेशी परतले आणि पुतिनविरोधकांच्या गळ्यातील ताईत बनले. तेव्हापासून ते या ना त्या प्रकारे तुरुंगास भोगत होते. वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी त्यांचा संशयास्पदरित्या झालेला मृत्यू रशियात काय होऊ शकतं ते दाखवणारा आहे.
रशियाने हे आरोप फेटाळले आहेत. नवाल्नी यांच्या मृत्यूबद्दल पुतिन यांना माहिती देण्यात आल्याचे ‘क्रेमलिन’ने जाहीर केले. मुळातच नवाल्नी यांना ‘अतिरेकी’ ठरवून तुरुंगात टाकण्यात आले होते. ते अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएच्या हातचे बाहुले आहेत, असा प्रचार पुतिनधार्जिण्यांनी केला होता. त्यांचे अनेक सहकारी युरोपात आश्रय घेऊन राहिल्याचेही सातत्याने अधोरेखित केले जात होते. त्यांना रशियात अनेकवेळा अटक झाली होती. राजकीय खटल्यांबरोबरच भ्रष्टाचार, घोटाळे, फसवणूक असे आरोपही त्यांच्यावर केले गेले. गेल्याच वर्षी एका फौजदारी खटल्यात त्यांना १९ वर्षांची अतिरिक्त शिक्षा देण्यात आली होती.