काही दिवासांपूर्वी उद्योग क्षेत्रातील सर्वांत मोठ्या व्यवहारांपैकी एक असलेला ट्विटरचा खरेदी व्यवहार पार पडला. ४४ अब्ज डॉलर्सला टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केली. नव्या मालकीनंतर कंपनीतील बदलांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आणि भीती होती. कर्मचाऱ्यांची ती भीती खरी ठरली. कारण एलॉन मस्क यांनी ५० टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला. आता कंपनीचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी भाष्य करत दिलगीरी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कर्मचारी कपातीनंतर जॅक डोर्सी यांनी ट्विट केलं आहे. “काळ कितीही कठीण असला तरी, त्यातून मार्ग निघतो. सध्याच्या परिस्थितीला मी जबाबदार आहे. मला माहिती आहे यामुळे बऱ्याच लोकांचा राग माझ्यावर आहे. कंपनीत वेगाने बदल केले, याबद्दल माफी मागतो,” अशी खंत जॅक डोर्सी यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मस्क यांच्या निर्णयानंतर ट्विटर भारत मधील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर आलं आहे. भारतामध्ये सुमारे २३० ते अडीचशेच्या दरम्यान ट्विटरचे कर्मचारी होते. मात्र, आता भारतामधील ट्विटरच्या कार्यालयात १० कर्मचारीही शिल्लक नाहीत. भारतात, बंगळुरू, गुरुग्राम आणि मुंबई अशी तीन ठिकाणी ट्विटरची कार्यालये आहेत. एलॉन मस्क यांनी कंपनीचा ताबा घेतल्यानंतर सीइओ पराग अग्रवाल, पॉलिसी चीफ विजया गड्डे आदी अतिवरिष्ठांना घरचा रस्ता दाखवला आहे.