गेली अनेक वर्षे माणूस मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी धडपडत असला तरी नासाच्या एका माजी कर्मचारी महिलेने मात्र १९७९ मध्ये दोन माणसे मंगळावर चालताना आपण व्हायिकंग यानाच्या दृश्यफितीत पाहिल्याचा दावा केला आहे. नासाने मात्र तिच्या या दाव्याला अजून  दुजोरा दिलेला नाही. या महिलेचे नाव जॅकी असे असून तिने व्हायकिंग यानाचे दूरसंदेशवहन पाहिल्यानंतर हा दावा इतर सहा सहकाऱ्यांसह केला आहे.
व्हायकिंग मोहिमेत दोन माणसे मंगळावर चालताना पाहिले असे तिचे म्हणणे आहे. व्हायकिंग लँडरने मंगळावरून पहिली छायाचित्रे पाठवली तेव्हा ती माणसे दिसल्याचे तिचे म्हणणे आहे.
माध्यमांच्या बातम्यानुसार या महिलेने कोस्ट टू कोस्ट एम रेडिओ स्टेशनला अमेरिकेत दूरध्वनी करून सांगितले, की आपण मंगळावर दोन माणसे चालताना पाहिली. जॅकीने रेडिओ सादरकर्त्यांस असेही सांगितले की, व्हायकिंग रोव्हर ही मंगळावर धावणारी पहिली गाडी होती. तेथे दोन माणसे अंतराळ सुटात चालताना दिसली. ते सूट फार वजनदार नसावेत,पण ते सुरक्षित होते. ते चालत क्षितिजापर्यंत व्हायकिंग एक्स्प्लोरर यानापर्यंत आले. त्यांच्या डोक्यावर हेल्मेटसारखे साधन होते पण ते अवकाशवीर परिधान करतात तसे नव्हते. आम्ही सहा जण ते संदेशवहन बघत होतो व अचानक ती व्हिडिओ दिसेनाशी झाली असे तिने शेवटी सांगितले.
वावडय़ांना ऊत
जॅकीच्या दाव्याने चर्चेला मात्र उधाण आले आहे. जॅकी नासाची कर्मचारी तरी आहे का, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे तर हा दावा निराधार आहे कारण मंगळावरून चित्रफित आली नाही. त्यामुळे दोन माणसं चालत आली, त्यांनी यानाच्या काचेवर पट्टय़ा चिकटवल्या, हे दावे हास्यास्पद आहेत, असे अंतराळ तज्ज्ञांनी सांगितले. या निमित्ताने उडत्या तबकडय़ांनी काही दशकांपूर्वी उडविलेल्या वावडय़ांचीही आठवण झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा