Kolkata Doctor case hearing CJI Chandrachud: कोलकाता येथील डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात चालू आहे. सदर प्रकरण घडल्यापासून ठिकठिकाणच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. याबाबतची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या सर्व डॉक्टर आणि कर्मचाराऱ्यांना कामावर परतण्याची विनंती केली आहे. तसेच तात्काळ सेवेवर रूजू न झाल्यास कायद्यानुसार कारवाई करावी लागेल, अशा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी स्वतःचा सरकारी रुग्णालयातील अनुभव व्यक्त करत डॉक्टर ज्या तळमळीने काम करत त्याचे कौतुकही केले.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, माझे नातेवाई सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्याबरोबर थांबण्यासाठी मला रुग्णालयातील फरशीवर झोपावे लागले होते. आम्हाला माहिती आहे सरकारी रुग्णालयातील डॉक्टर ३६ तास काम करतात. पण आता डॉक्टरांनी पुन्हा कामावर रुजू होणे गरजेचे आहे. जे गरीब रुग्ण सरकारी सेवेवर अवलंबून आहेत, त्यांना अशापद्धतीने वाऱ्यावर सोडता येणार नाही. जे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येतात, त्यांच्याबद्दल संवेदना बाळगली पाहीजे, असेही ते म्हणाले.

Kajol reveals weirdest rumour about her
काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Success Story of Dr. Prathap C. Reddy who goes to the office daily at 91 founder of Apollo Hospitals know his Net Worth
वयाच्या ९१व्या वर्षीही रोज जातात ऑफिसला, वाचा ७१ रुग्णालये आणि कोटींची संपत्ती असलेल्या डॉ. प्रताप रेड्डी यांचा प्रेरणादायी प्रवास
Apurva Nemlekar
“बिग बॉसच्या घरात मी कधीच…”, अपूर्वा नेमळेकर मानसिक आरोग्यावर बोलताना म्हणाली, “लोकांना माझ्यातील चिडकी…
Principal Secretary Forest B Venugopal Reddy
“अहंकाराचा गंध येतोय” म्हणत उच्च न्यायालयाची प्रधान वनसचिवांना अवमानना नोटीस, मात्र तासाभरातच….
doctor from Mumbai who was selling illegal drugs was arrested in Bhandara
पोतडीत औषध भरून उपचारासाठी लॉजवर यायचा मुंबईचा डॉक्टर; पोलिसांनी छापा टाकला अन् …
Supreme Court :
Supreme Court : “हा प्रक्रियेचा दुरुपयोग…”, हिंदुत्व शब्द बदलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
Hadapsar, nana bhangire, activists on the streets,
नेत्याच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत शिवसैनिक पायी निघाले, वाचा सविस्तर…

हे वाचा >> सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश, मुंबईतील प्रसिद्ध महिला डॉक्टरचाही फोर्समध्ये समावेश!

नाहीतर कारवाईस समोर जावे लागेल

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितले की, सर्वांनी आता कामावर परतायला हवे. तरच संबंधित यंत्रणा तुमच्यावर कारवाई करणार नाही. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, डॉक्टर कामावर गेले नाही तर देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडून जाईल. आम्ही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भावनांशी सहमत आहोत. जर कर्मचारी पुन्हा कामावर परतले तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. अन्यथा कायद्यानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल.

खंडपीठातील न्यायाधीश पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा म्हणाले की, जर डॉक्टर कामावर रुजू झाले तर त्यांची गैरहजेरी लागणार नाही. पण ते जर कामावर गेले नाहीत. तर कायद्यानुसार गैरहजेरी लागेल. तुम्ही आधी कामावर हजर व्हा, तिथून पुढे काही अडचण आल्यास तुमच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत. पण आधी कामावर रूजू व्हावे.

सर्वोच्च न्यायालयाकडून टास्क फोर्सची स्थापना

कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली. १८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याप्रकरणाची दखल घेतली आणि २० ऑगस्ट पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू केली. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

पहिल्याच दिवशी सुनावणी घेत असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी डॉक्टरांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कार्यपद्धती तयार करण्यासाठी ९ सदस्यीय राष्ट्रीय कार्य दलाची स्थापना करण्याचे आदेश दिले. या कार्य दलात विविध पार्श्वभूमीचे डॉक्टर असतील जे संपूर्ण भारतामध्ये अनुसरण करण्याच्या पद्धती सुचवतील जेणेकरुन कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची परिस्थिती असेल आणि तरुण किंवा मध्यमवयीन डॉक्टर त्यांच्या कामाच्या वातावरणात सुरक्षित असतील”, असे चंद्रचूड म्हणाले होते.