ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे नेते अकरबरुद्दीन ओवेसी यांनी भरसभेत पोलिसांना धमकावलं आहे. पोलिसांनी वेळेत सभा बंद करण्याची सूचना केल्याने त्यांनी पोलिसांनाच दम भरला. तेलंगणात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अकबरुद्दीन ओवेसी तेलंगणातील चंद्रयानगुट्टा येथून निवडणूक लढवत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकबरुद्दीन ओवेसी हैदराबाद येथील ललिताबाग येथे प्रचारसभा घेत होते. यावेळी संतोषनगरच्या एका पोलीस निरिक्षकाने नेत्यांना सभा वेळेत आटोपण्याची सूचना केली. यामुळे AIMIM चे नेते प्रचंड संतापले. भरसभेतच त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली.

“चाकू आणि गोळ्यांचा सामना केल्यामुळे मी कमजोर झालोय असं वाटतंय का तुम्हाला? माझ्यात अजूनही हिंमत आहे. पाच मिनिटे अजून उरली आहेत, मी आणखी पाच मिनिटे बोलणार. कोणी मायका लाल जन्माला आलेला नाही, जो मला थांबवू शकेल”, असं अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले.

त्यांनी लोकांना संबोधून विचारलं की, मी बरोबर बोललो ना? जर मी इशारा दिला तर तुम्हाला इथून जावं लागेल की आम्ही तुम्हाला पळवू? आम्हाला कमजोर करण्यासाठी हे लोक इथे येत असतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I still have guts police officer threatened by aimim leader in rally said knife and sgk