राफेल प्रकरणी महाधिवक्ता वेणुगोपाल यांनी संरक्षण मंत्रालयातून फायली चोरीस गेल्याचे न्यायालयात सांगितल्यानंतर शुक्रवारी त्या चोरीला गेल्या नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे  राफेल प्रकरणी चोरीला गेलेल्या फायली चोराने परत आणून दिल्या असाव्यात अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम् यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालयात वेणुगोपाल यांनी राफेलच्या फायली संरक्षण मंत्रालयातून चोरीस गेल्या असून त्याआधारे दी हिंदू वृत्तपत्राने बातम्या दिल्याचे सांगून चोरीचे पुरावे ग्राह्य़ धरू नयेत असा युक्तीवाद केला होता. नंतर त्यांनी कोलांटउडी मारून या फायली चोरीस गेलेल्या नसून कुणीतरी फायलीतील कागदांच्या छायांकित प्रती केल्याचा दावा केला.

चिदंबरम् यांनी सांगितले की, बुधवारी फायली चोरीस गेल्या होत्या, शुक्रवारी त्यांच्या छायांकित प्रती काढण्यात आल्या, मला वाटते की, चोरांनी गुरुवारी या चोरलेल्या फायली परत दिल्या असाव्यात. संरक्षण मंत्रालयातून राफेलच्या फाईल चोरीला गेल्या त्या चोरीच्या पुराव्या आधारे दी हिंदू वृत्तपत्राने बातम्या दिल्या व चोरीचा पुरावा ग्राह्य़ धरला जाऊ नये असा युक्तिवाद वेणुगोपाल यांनी केला होता.