भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहाने तब्बल ७ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचे प्राप्तिकर खात्याने सांगितले आहे. पूर्ती पॉवर ऍण्ड शुगर लिमिटेड या कंपनीच्या गेल्या दोन वर्षांमधील व्यवहारांची प्राप्तिकर खात्यामार्फत चौकशी करण्यात आली. यात कंपनीने ७ कोटी रुपयांची करचुकवेगिरी करण्यात आल्याचे प्राप्तिकर खात्याच्या निदर्शनास आले आहे.
यावर आम्हाला अजून कोणतीही नोटीस मिळालेली नसून काही चुकीचे केले आहे हे सिद्ध होत नाही, असे पूर्ती उद्योग समूहाने स्पष्ट केले आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून नितीन गडकरी कंपनीतील व्यवहारांशी संबंधित नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
“प्राप्तिकर खात्याच्या चौकशी दरम्यान, कंपनीला करचुकवेगिरी संबंधी नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत होते. पण अशा प्रकारची कोणतीही नोटीस अजून प्राप्तिकर खात्यामार्फत देण्यात आलेली नाही” असे पूर्ती कंपनीचे पीआरओ, नितीन कुलकर्णी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा