आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असलेले पॅनकार्ड मिळवण्यासाठी दाखल केल्या जाणाऱ्या नकली कागदपत्रांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रेशनकार्ड आणि भाडेपावती या कागदपत्रांना पॅनकार्डसाठी आवश्यक दस्तावेजांच्या यादीतून वगळण्याचा विचार प्राप्तिकर खात्याने चालवला आहे. त्याऐवजी जन्मतारखेचा दाखला किंवा तत्सम दाखला पॅनकार्ड मिळवण्यासाठी सक्तीचा करण्याचा विचार सध्या सुरू आहे.
आर्थिक व्यवहारांसह अनेक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून पॅनकार्ड ग्राह्य़ धरले जाते. पॅनकार्ड मिळवण्यासाठी बँक खाते पुस्तिका, शिधापत्रिका, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना, मालमत्ता कर पावती अशी कागदपत्रे पुरावा म्हणून मान्य केली जातात. मात्र अनेक ठिकाणी बनावट शिधापत्रिका वा भाडेपावती दाखवून पॅनकार्ड मिळवले जात असल्याचे आढळून आले आहे. बनावट पॅनकार्ड बाळगणाऱ्यांची संख्या देशात मोठी असल्याचेही प्राप्तिकर खात्याच्या पाहणीत आढळून आले आहे. या पाश्र्वभूमीवर पॅनकार्ड देण्याची योजना अधिक काटेकोर करण्याचा विचार प्राप्तिकर खात्याने चालू केला आहे. या पाश्र्वभूमीवर जन्मतारखेचा दाखला हा महत्त्वाचा पुरावा म्हणून मानला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच आवश्यक दस्तावेजाच्या यादीतून रेशनकार्ड व भाडेपावती हद्दपार करण्याचा विचार प्राप्तिकर खात्याने सुरू केला आहे.
पॅनकार्डसाठी जन्मदाखल्याची सक्ती?
आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असलेले पॅनकार्ड मिळवण्यासाठी दाखल केल्या जाणाऱ्या नकली कागदपत्रांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रेशनकार्ड आणि भाडेपावती या कागदपत्रांना पॅनकार्डसाठी आवश्यक दस्तावेजांच्या यादीतून वगळण्याचा विचार प्राप्तिकर खात्याने चालवला आहे.
First published on: 04-07-2013 at 07:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I t dept may make d o b proof mandatory for pan card