भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीगीर पुन्हा आक्रमक झाले आहेत. महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करणे आणि ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याची मागणी करत कुस्तीगीर जंतर-मंतर मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. यात विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिका या कुस्तीगिरांचा समावेश आहे. अशात विनेश फोगाटने मोठा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘द वायर’शी बोलताना विनेश फोगाटने सांगितलं, “मला माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी देण्यात येत आहे, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं होतं. मुलींना मानसिक त्रास देण्यात येत असून, चुकीचं होत असल्याचं पंतप्रधानांना म्हटलं. तेव्हा पंतप्रधानांनी आश्वासन देत, ‘आम्ही इथे बसलो आहोत. तुम्ही काळजी करू नका. आपल्या खेळावर लक्ष द्या,’ असं सांगितलं. पण, नंतरही ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून त्रास देण्यात येत होता.”

हेही वाचा : ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, दिल्ली पोलीस गुन्हा दाखल करणार

“पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे क्रीडामंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याशी भेटल्यावर २४ तासातच क्रीडा मंत्र्यांना बोलेला प्रत्येक शब्द ब्रिजभूषण सिंह यांना कळाला होता. क्रीडा मंत्री अथवा त्यांच्या कार्यालयातून ब्रिजभूषण सिंह यांना कळालं की माहिती नाही. मात्र, नंतर २४ तासातच आम्हाला फोन येण्यास सुरुवात झाली. ‘पंतप्रधानांना सांगण्याची तुमची हिंमत झाली कशी,’ ‘तुम्हाला बघून घेऊ,’ ‘सोडणार नाही’, अशा धमक्या देण्यात आल्या,” असं विनेश फोगाटने म्हटलं.

हेही वाचा : “देशाची प्रतिमा मलिन होते”, पी. टी. उषा यांच्या वक्तव्यावर शशी थरुर संतापले; म्हणाले, “खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याने…”

“आमच्या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळत आहे. पण, आत्मसन्मान तुटला आहे. आम्हाला पदक मिळाल्यावर पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती सन्मान करतात. परंतु, आम्ही रस्त्यावर उतरून सत्य बोलल्यावर सगळे लपून बसतात. फक्त फोटो काढण्यापुरता आत्मसन्मान आहे,” असेही विनेश फोगाट म्हणाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I told pm modi about threat me and my family but brijbhushan singh harassing say vinesh phogat ssa
Show comments