काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हा पंतप्रधान मोदींनी अशोक गेहलोत यांचं कौतुक करत टोलेबाजी केली होती. मी अशोक गेहलोत यांचं धन्यवाद मानतो. कारण, स्वातंत्र्यानंतर जी कामं झाली नाहीत, ते त्यांनी माझ्या हाताने करून दाखवली. राजस्थानच्या विकासकामांसाठी त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. ही आमच्या मैत्रिची ताकद आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

याला आता अशोल गेहलोत यांनी प्रत्युत्तर देत पंतप्रधानांची चतुराई मी ओळखतो असं म्हटलं आहे. अशोक गेहलोत म्हणाले, “पंतप्रधान मोदी भाषणात वापरत असलेल्या चतुराईबद्दल मला माहिती आहे. कारण, मीही अनेक वर्षापासून राजकारणात आहे. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणाची सुरुवात माझे मित्र अशोक गेहलोत म्हणून करणार. नंतर माझ्याच सरकारवर टीका करणार,” असं गेहलोत यांनी म्हटलं.

हेही वाचा : “विरोधक एकत्र आल्यामुळे भाजपा नैराश्यात”, नितीश कुमार यांची टीका; म्हणाले, “मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत…”

“पंतप्रधानांनी मानगढ येथे स्वत: सांगितलेलं, जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा अशोक गेहलोत देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री आहेत. मग, मी ज्येष्ठ आहे, तर पंतप्रधानांनी माझा सल्ला ऐकून जुनी पेन्शन योजना देशात लागू केली पाहिजे,” असं अशोक गेहलोत यांनी सांगितलं.

हेही वाचा : कर्नाटकच्या प्रचारसभेत राहुल गांधींचे अदाणी प्रकरणावरून भाजपावर टीकास्त्र, म्हणाले, “इतिहासात पहिल्यांदाच…”

राज्यांतील सरकारे पाडण्यावरूनही अशोक गेहलोत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्र सोडलं. “पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि मणिपुर येथील सरकारे पाडण्यात आली. यामुळे देशात एक नवीन पद्धत सुरू झाली,” असा आरोप गेहलोत यांनी केला आहे.

Story img Loader