पुलवामा हल्ला हा पाकिस्तानने केलेला नाही, त्याचे पुरावे असतील तर भारताने ते पुरावे जरूर द्यावे. आम्ही कारवाई करू, ये नया पाकिस्तान है. आम्हाला शांतता हवी आहे. पुलवामातला हल्ला आम्ही केलेला नाही. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. आत्तापर्यंत सत्तर हजार पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. दहशतवादामुळे सगळ्यात जास्त नुकसान पाकिस्तानचे झाले आहे. आम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये काहीही रस नाही. पाकिस्तानवर कारवाई करण्याची भाषा भारत करत असेल तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पुलवामा हल्ल्यासंदर्भातले सगळे आरोप फेटाळले आहेत. पुलवामाचा हल्ला आम्ही घडवलेला नाही. काश्मीरचा प्रश्न हा चर्चेने सुटेल हा आमचा विश्वास आहे. आम्ही चर्चेची भाषा करून हल्ला का घडवू? असाही उलट प्रश्न इम्रान खान यांनी विचारला आहे. पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. यानंतर या हल्ल्याचा करारा जवाब द्या अशी मागणी होते आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणी लष्कराला पूर्ण सूट दिली आहे.

मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत. आमचा पाकिस्तान हा नवा पाकिस्तान आहे आम्हाला शांतता हवी आहे. त्यामुळे काश्मीरचा प्रश्न हा चर्चेने सुटला पाहिजे. दरवेळी काश्मीरमध्ये काही घडले की भारताकडून आमच्यावर आरोप होतो. असाच आरोप आत्ताही केला गेला आहे. पुरावे दिले तर आम्ही कारवाई करू कारण हल्ला करणारे जर पाकिस्तानचे असतील तर ते पाकिस्तानचे गुन्हेगार आहेत असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. तुम्ही युद्ध पुकारलेत तर आम्हीही गप्प बसणार नाही उत्तर देऊ असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

Story img Loader