आगामी काळात भाजप पक्ष केंद्रात सत्तेत आला तरी, आपण मात्र पक्षात परतरणार नसल्याचे भाजपमधील बंडखोर नेते जसवंत सिंह यांनी स्पष्ट केले. मला भविष्यात स्वतंत्ररित्या काम करायला अधिक आवडेल त्यामुळे केंद्रात एनडीएची सत्ता आली तरी, भाजपमध्ये पुन्हा सामील होण्याचा आपला कोणताही इरादा नसल्याचे जसवंत सिंह यांनी सांगितले. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्याने जसवंतसिंह यांनी राजस्थानमधील बारमेर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भाजपमधून बाहेर पडण्याचा माझा निर्णय टोकाचा नव्हता. पक्षाने तिकीट नाकारल्यानेच मी बाहेर पडण्याचा स्वाभाविक निर्णय घेतला. तसेच माझा मुलगा मानवेंद्रसिंह यालाही पक्षातून बाहेर काढण्याचा निर्णय चुकीचा होता असे सिंह यांनी पत्रकारांना सांगितले.