निवडणूक प्रचारासाठी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांचा जामीन मंजूर केला होता. मद्य धोरणप्रकरणी त्यांना अटक झाली होती. आता २१ दिवसांच्या जामीनाची मुदत उद्या म्हणजे १ जून रोजी संपत असून २ जून रोजी त्यांना तिहार तुरुंगात हजर राहायचं आहे. त्याआधी त्यांनी जनतेशी भावनिक संवाद साधला आहे.

अरविंद केजरीवाल यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी जामीन मुदती वाढवून मागितली होती. परंतु, जामीन मुदतीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनेच फेटाळून लावला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना आता ३ जून रोजी तिहार तुरुंगात हजर राहावं लागणार आहे. त्याआधीच त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत जनतेशी संवाद साधला आहे.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत!
Donald Trump Imran Khan Fact Check video
“इम्रान खान माझे मित्र, लवकरच त्यांना तुरुंगातून बाहेर काढेन”; डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासन? VIDEO खरा की खोटा

“सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रचारासाठी २१ दिवसांचा जामीन दिला होता. उद्या २१ दिवस पूर्ण होत आहेत. परवा मला सरेंडर व्हायचं आहे. मी पुन्हा तिहार तुरुंगात जाईन. मला माहित नाही यावेळी ते मला कितीवेळ तुरुंगात ठेवतील. पण माझे मन मोठे आहे. देशाला हुकूमशाहीतून वाचवण्यासाठी तुरुंगात जातोय, याचा मला अभिमान आहे”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

त्यांना नेमकं काय हवंय हे कळत नाहीय

“यांनी मला तोडण्याचा, हरवण्याचा, झुकवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. मी जेव्हा तुरुंगात होतो तेव्हा त्यांनी मला अनेक त्रास दिले. त्यांनी माझा औषधोपचार रोखला. २० वर्षांपासून मी मधुमेहाचा रुग्ण आहे. गेल्या २० वर्षांपासून मला रोज चारवेळा इन्सुलिनचे इंजेक्शन माझ्या पोटात दिले जातात. तुरुंगात यांनी कित्येक दिवस इन्सुलिन बंद केलं. त्यामुळे माझी शुगर ३००-३२५ पर्यंत पोहोचली. इतके दिवस शुगर उच्च पातळीवर राहिल्यास किडनी आणि लिव्हर खराब होतो. त्यांना काय पाहिजे माहीत नाही, ते असं का करतात हे कळत नाहीय”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> अन्वयार्थ : ‘विशेष वागणुकी’ला मुदतवाढ नाही!

मला मोठ्या आजाराचं लक्षण दिसतंय

“तुरुंगात मी ५० दिवस होतो. या ५० दिवसांत माझं ६ किलोने वजन कमी झालंय. तुरुंगात गेलो तेव्हा माझं वजन ७० किलो होतं. आता ६४ किलो आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही वजन वाढलं नाही. डॉक्टर म्हणाले की शरीरातील मोठ्या आजाराचं हे लक्षण आहे. त्यासाठी काही चाचण्या करण्याची गरज आहे. माझ्या युरिनमध्ये किटोन पातळी वाढली आहे”, अशी तक्रारही त्यांनी सांगितली.

हेही वाचा >> “काँग्रेसशी कायमचा घरोबा नाही”, अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान; म्हणाले, “…त्यामुळेच हरियाणात विरोधात लढलो”!

मी कुठेही असलो तरीही कामं थांबणार नाहीत

“परवा मी शरण जाणार आहे. त्यासाठी मी दुपारी ३ वाजता घरातून निघेन. कदाचित यावेळी ते अधिक त्रास देतील. पण मी झुकणार नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या. तुरुंगात मला तुमची फार काळजी वाटते. तुम्ही आनंदी असाल तर तुमचा केजरीवाल आनंदी राहील. मी तुमच्या आजूबाजूला नसेन पण तुमची कामं सुरू राहणार आहेत. मी कुठेही असलो तरीही तुमची कामं थांबणार नाहीत. मी परत आल्यावर कुटुंबातील प्रत्येक माताभगिनीला हजार रुपये देण्याचीही योजना सुरू करणार आहे”, असं त्यांनी जनतेला आवाहनही केलं.

“मी नेहमीच तुमच्या कुटुंबातील एक मुलगा बनून माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे. मी आज माझ्या कुटुंबासाठी तुमच्याकडून काहीतरी मागू इच्छितो. माझे आई-वडिल फार वृद्ध आहेत. माझी आई सतत आजारी असते. तुरुंगात मला त्यांची फार काळजी वाटते. माझ्या मागे माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थनेत फार ताकद असते. तुम्ही माझ्या आईसाठी रोज प्रार्थना केली तर ती सुदृढ राहील. माझी पत्नी सुनीता खूप मजबूर आहे. तिने नेहमीच माझ्या कठीण परिस्थितीत मला साथ दिली आहे. कठीण समयी संपूर्ण कुटुंब एक होतं. माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात तुम्ही मला साथ दिली आहे. आपण सर्व हुकूमशाहीविरोधात लढत आहोत. देशाला वाचवण्याकरता माझे प्राण गेले तरी दुःख वाटून घेऊ नका. तुमच्या प्रार्थनेमुळेच मी जिवंत आहे. तुमच्या आशीर्वादामुळेच मी जिवंत राहणार आहे. देवाची इच्छा असेल तर तुमचा हा मुलगा लवकरच परत यईल”, असं म्हणत त्यांनी दिल्लीकरांकडून आशीर्वाद मागितले आहेत.