पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरतमध्ये होणाऱया कवि संमेलनाला जाणार नसल्याचे आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी बुधवारी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले. मला या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळालेले नाही, तर मी कसा काय जाऊ, असे कुमार विश्वास म्हणाले.
कुमार विश्वास मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कविसंमेलनाला जाणार अशा आशयाचे वृत्त वृत्तवाहिन्यांवरून दाखविण्यात येत होते. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुकही केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर कुमार विश्वासही आम आदमी पक्षाला रामराम ठोकणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला होता.
मला कविसंमेलनाचे निमंत्रण देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, कोणतेही निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे आता कविसंमेलनाला जाण्याचा प्रश्नच येत नाही. माध्यमांना माझ्याविरूद्ध काय बोलायचे ते बोलू देत, आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असेही कुमार विश्वास म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा