स्पॉट फिक्सिंग, सट्टेबाजीमुळे प्रतिमा डागाळलेल्या आयपीएलच्या अध्यक्षपदी पुढच्यावर्षी कार्यरत राहण्याची इच्छा नसल्याचे राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे. आयपीएलच्या सहाव्या सिझनचा समारोप गेल्या रविवारी मुंबई इंडियन्सच्या विजयाने झाला असला, तरी यंदा ही स्पर्धा गाजली ती मैदानाबाहेर काही खेळाडूंनी सट्टेबाजांच्या साह्याने दाखवलेल्या ‘गुणां’मुळे.
आयपीएलचे अध्यक्षपद हे प्रत्यक्षात एक वर्षासाठीचे पद आहे. दरवर्षी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पदावरील नियुक्ती करण्यात येते. याआधी दोन वेळा राजीव शुक्ला हेच या पदावर विराजमान होते. मात्र, पुढच्यावर्षी ही जबाबदारी स्वीकारण्यात स्वारस्य नसल्याचे शुक्ला यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.
आयपीएलचा अध्यक्ष म्हणून माझे काम केवळ सामन्यांचे आयोजन करणे एवढेच आहे. यंदाही आयपीएलच्या सर्व सामन्यांचे आयोजन उत्तमरित्या झाले. अनेक वादविवादांच्या पार्श्वभूमीवरही क्रिकेटप्रेमींनी आयपीएलच्या सर्वच सामन्यांना भरभरून प्रतिसाद दिला, असेही शुक्ला यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा