पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यांनी त्यांच्या सरकारवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आज देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी त्यांच्या राजकारणातील प्रवेशापासून ते पाकिस्तानच्या विकासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
राष्ट्राला संबोधित करताना इम्रान खान यांनी मुशर्रफ यांच्यावर टीका केली. खान म्हणाले की, “मुशर्रफ यांची सर्वात मोठी चूक म्हणजे अमेरिकेचा वकिली आहे. मी मुक्त परराष्ट्र धोरणाचा समर्थक आहे. आमचे परराष्ट्र धोरण पाकिस्तानी लोकांसाठी आहे. मला भारत किंवा इतर कोणाचा विरोध नको आहे. पाकिस्तानने अमेरिकेशी युद्ध केले आणि त्यांनीच निर्बंध लादले. मी कधीही झुकणार नाही आणि माझ्या समाजालाही झुकू देणार नाही. आपला देश दहशतवादाच्या विरोधात आहे,” असा दावा इम्रान खान यांनी केला.
“नवाझ शरीफ हे भारताचे पंतप्रधान मोदींना…”; इम्रान खान यांचा गंभीर आरोप
“माझा राजीनामा मागितला जातोय. मी राजीनामा दिल्यास पाकिस्तानच्या अडचणी कमी होतील, असं म्हटलं जातंय. जे माझ्यासोबत क्रिकेट खेळायचे त्यांनी मला शेवटच्या चेंडूपर्यंत लढत असल्याचे पाहिले आहे. मी आयुष्यात कधीही हार मानली नाही. निकाल काहीही लागो, त्यानंतर मी आणखी मजबूत होऊन बाहेर पडेन,मी राजीनामा देणार नाही. ही लढाई मी शेवटपर्यंत लढणार आहे. रविवारी पाकिस्तानच्या भवितव्याचा निर्णय होईल. अविश्वास प्रस्ताव पाकिस्तानचे भवितव्य ठरवेल,” असं इम्रान खान म्हणाले. त्यामुळे सध्या त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी आपण राजीनामा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.