८९ व्या वर्धापन दिनीनिमित्ताने आज भारतीय वायू दलाने नवी दिल्ली इथल्या वायू दलाच्या हिंडन या विमानतळावर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय वायू दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांना सलामी देत झाली. भारतीय वायू दलाच्या स्थापना दिनानिमित्त वायू दल प्रमुखांनी मग उपस्थितांना संबंधित केले. त्यानंतर भारतीय वायू दलाच्या हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने, वाहतूक करणारी विमाने यांच्या विविध कसरतींनी, ‘एअर शो’ने उपस्थितांची मने जिंकली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या एअर शोची सुरुवात ‘तेजस’ या लढाऊ विमानाच्या प्लायपास्टने झाली. हवेत विविध कोनातून सूर मारत तेजसने हिंडन विमानतळाचा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर ‘चिनूक’ या मालवाहू हेलिकॉप्टरनी एम ७७७ हॉवित्झर ही तोफ वाहून नेत सर्वांना थक्क करुन सोडले. ‘अपाचे’ आणि ‘एमआय-३५’ ही लढाऊ हेलिकॉप्टर आणि सर्वात मोठे मालवाहु विमान सी-१७ यांचा फ्लायपास्ट हा लक्षवेधी ठरला. भारतीय वायू दलाच्या मिग-२१, मिग-२९, जग्वार, सुखोई -३० एमकेआय या लढाऊ विमानांनी वेगाने जात दिलेली सलामी आकर्षक ठरली. सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो जगात हवाई कसरती साठी प्रसिद्ध असलेल्या ‘सारंग’ नावाच्या हेलिकॉप्टरच्या ताफ्याने सादर केलेला प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम. विविध कोनातून सुर मारत, अशक्य असा प्रकारची वेगाने विविध वळणे घेत ‘सारंग’ नी उपस्थितांची मने जिंकली.

दरम्यान नवनियुक्त वायू दल प्रमुख एअर चिफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी भाषणात वायू दलाचे अधिकारी आणि सैनिक यांचे कौतुक केले. गेले वर्षभर विपरीत आणि आव्हानात्मक परिस्थीतीमध्ये चोख कामगिरी बजावल्याबद्दल वायू दल प्रमुखांनी पाठ थोपटली. करोना काळांत केलेले वैद्यकीय सहकार्य, अफगाणिस्तानमधून लोकांना देशात सुरक्षित आणणे आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये केलेली चोख तयारी याबद्दल समाधान व्यक्त केले. विशेषतः पुर्व लडाखमध्ये अल्प काळात भारतीय वायू दलाने केलेली तयारी आणि दाखवलेली युद्धक्षमता याची प्रशंसा व्ही आर चौधरी यांनी केली.  देशाला दाखवून दिले पाहिजे की बाह्य शक्ती आपल्या सीमेचे उल्लंघन करणार नाही, तशी तयारी ठेवूयात असं आवाहन वायू दल प्रमुखांनी यावेळी वायू दलाला केलं. 

ब्रिटीशांनी ८ ऑक्टोबर १९३२ ला तत्कालीन भारतात ‘रॉयल एअर फोर्स’ या नावाने वायू दलाची स्थापना केली. थोडक्यात या दिवसापासून भारतीय वायू दलाच्या जडणघडणीला सुरुवात झाली. म्हणून हा दिवस ‘स्थापना दिवस’ म्हणून भारतीय वायू दल साजरा करत आला आहे. आज भारतीय वायू दल हे जगात चौथ्या क्रमांकाचे एक सक्षम वायू दल म्हणून ओळखले जाते.