भारतीय हवाई दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर उत्तर प्रदेशातील सितापूरमध्ये कोसळल्याने सात जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण भारतीय हवाई दलात कार्यरत होते. ते बरैलीतून अलाहाबादकडे निघाले होते.
हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी वैमानिकाने इमर्जन्सी कॉल दिला होता. त्यानंतर त्याचा रडारशी संपर्क तुटला आणि ते कोसळले, अशी माहिती हवाई दलाच्या प्रवक्त्याने दिली आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजून ५३ मिनिटांनी या हेलिकॉप्टरने बरैलीतून उड्डाण केले होते आणि चार वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास ते कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि पाच जवान होते. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी हवाई दलाने चौकशी आयोग नेमला आहे.
उत्तर प्रदेशात हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, सात ठार
भारतीय हवाई दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर उत्तर प्रदेशातील सितापूरमध्ये कोसळल्याने सात जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला.
First published on: 25-07-2014 at 08:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iaf chopper crashes in up seven personnel dead