वीस मुलकी सेवा अधिकाऱ्यांच्या महासंघाने सातव्या वेतन आयोगाकडे याचिका दाखल केली असून जातीच्या आधारे भेदभाव केला जात असल्याचा व आयएएस तसेच इतर सेवा यांच्यात समानता नसल्याचा आरोप केला आहे.
सातव्या वेतन आयोगाकडे दाखल केलेल्या याचिका अर्जात संघटनेने म्हटले आहे की, आयएएस अधिकाऱ्यांचा नेहमीच वरचष्मा राहतो हे बरोबर नाही.
प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या वादाला आता अधिकृत रूप मिळाले आहे. आयएएस अधिकाऱ्यांना महत्त्वाचे स्थान मिळते याबाबत तर दुमत नाहीच पण कुठल्याही पदाची आव्हाने व इतर बाबी यात तफावत असल्याचेही मात्र मान्य करता येणार नाही. पण या सर्व सेवांमध्ये समानता नाही. अनेकदा दुजाभाव केला जातो, असे मुलकी सेवा संघटना महासंघाने म्हटले आहे.

Story img Loader