केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करून आत्महत्या केलेला मंजुनाथ हा उमेदवार पूर्व परीक्षेतच नापास झाला होता, असा खुलासा आयोगाने सोमवारी केला. लोकसेवा आयोग देशामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, पोलिस सेवा, परराष्ट्र सेवा इत्यादी विविध सेवांसाठी परीक्षा घेते. आयोगाने नुकतेच गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर केले. त्यामध्ये कोणतीही चूक झालेली नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
व्ही. वाय. मंजुनाथ हा उमेदवार गेल्यावर्षी झालेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेला बंगळुरूमधून बसला होता. मात्र, तो पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाला नसल्याचे आयोगाने सांगितले. जर तो पूर्व परीक्षेतच नापास झाला असेल, तर मुख्य परीक्षेला बसण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यामुळे काही माध्यमांमध्ये याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त अपुऱया माहितीवर आधारलेले असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

Story img Loader