काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा आणि डीएलएफ यांच्यातील करारासंदर्भात काही खळबळजनक खुलासे करणारे सनदी अधिकारी अशोक खेमका यांच्याविरुद्ध आज (गुरूवार) हरियाणा सरकारने आरोपपत्र दाखल केले आहे.
खेमकांच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा
अशोक खेमका यांच्यावर वढेरा आणि ‘डिएलएफ’ यांच्यातील करार रद्द करण्यासाठी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. तसेच या संदर्भात उत्तर देण्यासाठी त्यांना पंधरा दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावले, तर घोटाळेच होणार नाहीत
वडेरा यांनी गुडगाव येथे ३.५३ एकर जमीनच्या कागदपत्रांमध्ये फसवणूक करून व्यवसायिक परवान्यावर नफा कमावल्याचा आरोप आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी केला होता. वडेरा-डीएलएफ यांच्यातील व्यवहाराच्या चौकशी प्रकरणी गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात हरियाणा सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीमध्ये विस्तृत अहवाल सादर करण्यात आला होता.
वंजारांबरोबरच खेमकाही हवेत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा