देशभर दलित समाजातील लोकांवर अत्याचाराचे वृत्त समोर येत असताना आता चक्क वरिष्ठ आयएएस अधिकारीही त्यात भरडला गेल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून छळ होत असून सातत्याने धमकी दिली जात असल्याचा आरोप अशोक परमार या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याने केला आहे. या अधिकाऱ्याची आतापर्यंत वर्षभरात पाचवेळा बदली करण्यात आली आहे. याप्रकरणी निःपक्षपाती चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशोक परमार हे १९९२ बॅचचे आयएएस अधिकारी असून ते मुळचे गुजरातचे आहेत. त्यांनी त्यांच्या छळाविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगात तक्रार दाखल केली आहे. जलशक्ती विभागातील अनियमितता उघड केल्यानंतर अशोक परमार यांना जम्मू आणि काश्मीर प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार केली आहे. या अधिकाऱ्याने केंद्रीय गृहसचिवांना पत्रही लिहून तसा आरोप केला आहे. दोन उच्चस्तरीय बैठकांमधून त्यांना जाणीवपूर्वक अलिप्त ठेवण्यात आले, तसंच इतर अधिकाऱ्यांसमोर त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी पत्रांतून केला आहे.

हेही वाचा >> विमानात आता ‘Adults Only’ झोन; युरोपियन विमान कंपनीचा प्रयोग चर्चेत; नेमका काय आहे प्रकार?

केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेले परमार यांना मार्च २०२२ मध्ये AGMUT संवर्गात पाठवण्यात आले. त्यानंतर, त्यांना मुख्य सचिव सिंचन आणि पूर नियंत्रण म्हणून नियुक्त करण्यात आले. ५ मे २०२२ रोजी त्यांची जलशक्ती विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली. परमार यांच्या म्हणण्यानुसार, विभागातील घोटाळे उजेडात आणल्यानंतर काही महिन्यांत एआरआय आणि प्रशिक्षण विभागात त्यांची बदली झाली.

१८ जुलै रोजी त्यांची कौशल्य विकास विभागात बदली झाली. दोन आठवड्यांनंतर, १ ऑगस्ट रोजी त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आणि त्यांना ब्यूरो ऑफ पब्लिक एंटरप्रायझेस J&K चे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. प्रधान सचिव एआरआय (प्रशासकीय सुधारणा, तपासणी) या त्यांच्या कार्यकाळात परमार यांनी अधिवेशन मोडून विविध जिल्ह्यांना भेटी देण्यास सुरुवात केली आणि विविध विभागांच्या विरोधात चौकशी सुरू केली.