Disability Quota : अपंगत्वाचं प्रमाणपत्र सादर करून नागरी सेवेत अधिकारी झालेल्या प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण समोर आल्यानंतर एका वरिष्ठ महिला अधिकाराने अपंगांच्या कोट्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी एक्स पोस्टद्वारे यावर या कोट्यावर आक्षेप घेतला आहे

तेलंगणाच्या वित्त आयोगाच्या सदस्य सचिव स्मिता सभरवाल पोस्टमध्ये म्हणाल्या की, “दिव्यांग व्यक्तींचा मी आदर करते. पण एखादी एअरलाइन अपंगत्व असलेल्या पायलटला कामावर ठेवते का? किंवा तुम्ही अपंग असलेल्या सर्जनवर विश्वास ठेवाल का?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Protest against obscene remarks of BJP leader Pasha Patel in Karjat Jamkhed by burning effigy
भाजप नेते पाशा पटेल यांच्या अश्लील वक्तव्याविरोधात कर्जत जामखेड मध्ये महिलांचा एल्गार, पुतळा जाळून निषेध
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल

हेही वाचा >> Puja khedkar : पुणे पोलिसांच्या दुसऱ्या समन्सनंतरही पूजा खेडकर गैरहजर

“AIS (IAS/IPS/IFoS) चे स्वरूप फील्ड-वर्कचे आहे. दीर्घकाळ काम करावं लागतं. लोकांच्या तक्रारी ऐकून घ्याव्या लागतात. यासाठी फिटनेस अत्यावश्यक आहे. त्यामुळे या सेवेत प्राथमिदृष्ट्या कोट्याची आवश्यकता आहे का?”, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांच्या पोस्टनंतर वाद सुरू झाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या दृष्टीकोनाला दयनीय असं म्हटलंय. त्या म्हणाल्या, “हा एक दयनीय आणि बहिष्कृत दृष्टिकोन आहे. नोकरशहा त्यांचे मर्यादित विचार आणि त्यांचे विशेषाधिकार असे दाखवतात हे पाहणे हास्यास्पद आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांच्या या पोस्टवर स्मिता सभरवाल यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत म्हटलं की, “मॅडम, जर नोकरशहा प्रशासनाच्या समर्पक मुद्द्यांवर बोलू शकत नाहीत, तर कोण बोलणार? माझे विचार आणि चिंता २४ वर्षांच्या कारकि‍र्दीच्या अनुभवातून आलेली आहे, हे विचार मर्यादित नाहीत. मी काय म्हटलंय हे काळजीपूर्वक वाचा. मी म्हटलंय की, इतर केंद्रीय सेवांच्या तुलनेत AISचे निकष वेगळे असतात. प्रतिभावान भिन्न-अपंग व्यक्तींना नोकरीची उत्तम संधी मिळू शकते.”

चौकशीकरता पूजा खेडकर गैरहजर

दरम्यान, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरुद्ध छळवणुकीची तक्रार प्रकरणात प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना समन्स बजाविण्यात आले. जबाब नोंदविण्यासाठी त्यांना दोन दिवसांचा अवधी देण्यात आला होता. दोनवेळा समन्स बजावूनही खेडकर शनिवारी सायंकाळपर्यंत जबाब नोंदविण्यसाठी उपस्थित राहिल्या नाहीत.