आयएएस अधिकारी टीना डाबी यांचा पूर्वाश्रमीचे पती आणि २०१५ मधील युपीएससीचे दुसऱ्या क्रमांकाचे टॉपर अतहर आमीर खान पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. अतहर खान यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली आहे. अतहर खान डॉक्टर मेहरीन काजी यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांनीही #engagement हॅशटॅगसोबत साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

PHOTOS: IAS अधिकारी टीना डाबी आणि प्रदीप गावंडेंचा बौद्ध पद्धतीने विवाह; लग्नात बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोने वेधलं लक्ष

अतहर खान यांनी २०१८ मध्ये टीना डाबी यांच्यासोबत लग्न केलं होतं. दोन वर्षांनी २०२० मध्ये त्यांनी सहमतीने तलाक घेतला होता. एप्रिल महिन्यात टीना डाबी यांनी २०१३ मधील बॅचचे आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर आता अतहर खानदेखील दुसऱ्यांदा लग्न करत आहेत.

डॉक्टर मेहरीन काजी यांनीदेखील इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

अतहर खान आणि टीना डाबी यांच्यात ट्रेनिंगदरम्यान प्रेमसंबंध निर्माण झाले होते. धर्माच्या भिंती तोडून २०१८ मध्ये झालेल्या त्यांच्या या लग्नाची बरीच चर्चा रंगली होती. अनेक हिंदू संघटनांनी या लग्नाला विरोध केला होता. काही लोकांनी याला लव्ह जिहादही म्हटलं होतं. पण दोनच वर्षात त्यांनी घटस्फोट घेतला. लग्नानंतर अतहर खान राजस्थानमध्ये कार्यरत होते. पण तलाक झाल्यानंतर त्यांनी जम्मू काश्मीर कॅडर घेतलं आणि आपल्या राज्यात गेले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ias tina dabi ex husband athar amir khan to marry again dr mehreen qazi sgy