IAS Whatsapp Group Controversy : केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आयएएस अधिकाऱ्याच्या नंबरवरून तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदू आणि मुस्लिम असे दोन व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले होते. हा वाद वाढल्यानंतर दोन्ही व्हॉट्सॲप ग्रुप डिलीट करण्यात आले. मात्र, यावरून वाद सुरु झाला आहे. या सर्व प्रकारानंतर संबंधित अधिकाऱ्याने आपला मोबाईल हॅक झाल्याचा दावा केला आहे. आयएएस अधिकाऱ्यांचे धर्माच्या आधारावर ग्रुप करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर तिरुवनंतपुरम पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आयएएस अधिकारी के गोपालकृष्णन यांनी आपला फोन हॅक झाल्यानंतर ‘मल्लू हिंदू ऑफिसर’ आणि ‘मल्लू मुस्लिम ऑफिसर’ असे दोन व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. ‘मल्लू हिंदू ऑफिसर्स’ हा ग्रुप ३० ऑक्टोबर रोजी तयार करण्यात आला होता. त्यामध्ये हिंदू असलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी सदस्य म्हणून जोडण्यात आले होते. मात्र, हा ग्रुप तयार करण्यात आल्याच्या काही तासानंतर हटविण्यात आला. त्यानंतर गोपालकृष्णन यांनी ग्रुपमधील सदस्यांना माहिती दिली की कोणीतरी त्यांचा फोन ताब्यात घेतला आणि ११ ग्रुप तयार केले. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : “दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना…”, काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सतेज पाटील संतापले
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
sharad pawar ajit pawar supreme court clock symbol
Supreme Court : ‘घड्याळ’ कोणाचं? शरद पवार की अजित पवार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; म्हणाले…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
Delhi Pregnant teen murder
Pregnant teen murder: गर्भवती प्रेयसीचा लग्नासाठी तगादा; प्रियकरानं करवा चौथचा उपवास ठेवायला सांगितला आणि नंतर खड्डा खणून…
Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh sexual harassment
Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा

हेही वाचा : Mig 29 Crasesh : भारतीय हवाई दलाचे मिग २९ लढाऊ विमान कोसळले; जमिनीवर कोसळताच आगीत भस्मसात!

या संपूर्ण प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना गोपालकृष्णन यांनी सांगितलं की, “‘मल्लू मुस्लिम ऑफिसर’ हा आणखी एक ग्रुप तयार करण्यात आला होता. मात्र, मला याबाबत माझ्या काही सहकाऱ्यांनी सावध केल्यानंतर मी हे ग्रुप डिलीट केले. यानंतर या प्रकाराबाबत सोमवारी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त स्पर्जन कुमार यांनी माहिती सांगितलं की, “आमच्याकडे आज तक्रार दाखल झाली. यानंतर तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र, हे ग्रुप डिलीट झाल्यामुळे आम्ही व्हॉट्सॲपकडे तपशील मागवला आहे. तो तपशील आल्यानंतर खरंच फोन हॅक झाला होता का? तसेच हे व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले गेले होते का? याची माहिती मिळू शकेल. याबाबत चौकशी सुरु आहे”, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी सांगितली.

दरम्यान, याबाबत आयएएस अधिकाऱ्यांकडूनही स्पष्टीकरण मागवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत मंत्री पी राजीव यांनीही प्रतिक्रिया देत राज्य सरकार या प्रकरणाची चौकशी करेल. धर्माच्या आधारावर गट निर्माण झाले असतील तर ती गंभीर बाब आहे. मात्र, आता तपास पूर्ण होऊ द्या, असं म्हटलं आहे.