पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘आयसी-८१४ : द कंदहार हायजॅक’ या वेबमालिकेतील अपहरणकर्त्यांच्या चित्रणामुळे वाद निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने ‘नेटफ्लिक्स’च्या आशय प्रमुखांना समन्स बजावले असून कोणालाही देशाच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘नेटफ्लिक्स इंडिया’च्या आशय प्रमुखांना सोमवारी समन्स बजावले. ‘आयसी-८१४ : द कंदाहार हायजॅक’ या वेबमालिकेत १९९९ साली पाकिस्तानस्थित हरकत-उल-मुदाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे केलेल्या अपहरणाचे चित्रण आहे. त्यातील कथितरित्या वादग्रस्त भागाबद्दल स्पष्टीकरण द्यावे असे ‘नेटफ्लिक्स’ला सांगण्यात आले आहे. यातील दहशतवाद्यांची मानवी बाजू दाखवण्यात आल्याचा आरोप करत काही प्रेक्षकांनी टीका केली आहे. ‘‘कोणालाही या देशाच्या लोकांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नाही. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे नेहमीचा आदर करण्यात आला आहे,’’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आमच्या सांस्कृतिक मूल्यांना परदेशी लोकांनी नेभळट ठरवण्यास आम्ही परवानगी द्यावी का असा प्रश्न त्यांनी विचारला. तुम्ही उदारमतवादी असू शकता पण चुकीच्या पद्धतीने संस्थांशी खेळू शकत नाही असे ते म्हणाले. अपहरणकर्त्यांची समुदाय ओळख लपवण्यासाठी त्यांची ‘शंकर’ आणि ‘भोला’ अशी नावे ठेवण्यात आल्याचा आरोप काही प्रेक्षकांनी केला आहे. ‘एक्स’सारख्या समाजमाध्यमांवर बॉयकॉट ‘नेटफ्लिक्स’, बॉयकॉट बॉलिवूड आणि आय८१४ असे अनेक हॅशटॅग चालवण्यात येत आहेत.

हेही वाचा >>>तेलंगण, आंध्र प्रदेशात पावसाचा हाहाकार

निर्माता अनुभव सिन्हा यांनी दहशतवाद्यांची बिगर-मुस्लीम नावे वापरून त्यांच्या गुन्हेगारी हेतूला वैधता मिळवून दिली आहे. काही दशकांनी लोकांना वाटेल की हिंदूंनी ‘आयसी-८१४’चे अपहरण केले होते.- अमित मालवीय, भाजप आयटी सेलप्रमुख

‘आयसी-८१४’ सिरीज भाजप सरकारच्या घोर अपयशाचे स्मरण करून देत असल्यामुळे उजव्या विचारसरणीच्या लोकांचा संताप झाला आहे. या सिरीजमुळे मसूद अझहर, उमर शेख आणि मुश्ताक जरगर यासारख्या भयंकर दहशतवाद्यांची सुटका करून भारताच्या सध्याच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी आणि तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनी व्यक्तिश: त्यांची पाठवणी केली होती.- प्रियंका चतुर्वेदी, खासदार, शिवसेना (ठाकरे गट)