इंडियन एअरलाइन्सच्या विमान क्रमांक आयसी-८१४ चं अपहरण करुन त्यामधील रुपिन कात्याल याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा दहशतवादी ठार झालाय. या विमानाचं अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी एक असणाऱ्या मिस्री झाहूर इब्राहिम ऊर्फ जमाइलला कराचीमध्ये एक मार्च रोजी एका अनोळखी बाईकस्वाराने गोळ्या घालून ठार केलं. जमाइलचा मृत्यू झाल्याने आता या प्रकरणामधील जैश-ए-मोहम्मदचे पाच पैकी दोनच दहशतवादी जिवंत आहेत. मसूद अझरचा मोठा भाऊ इब्राहिम अझर आणि रौफ असगर हे दोन दहशतवादी अद्यापही जिवंत असून ते जागतिक स्तरवरील दहशतवाद्यांच्या यादीत आहेत.
२५ वर्षीय रुपिन कात्याल जमाइलने २५ डिसेंबर १९९९ रोजी हत्या केली होती. विमानामधील एका तिक्ष्ण हत्याराने गळा चिरुन रुपिनची हत्या करण्यात आलेली. रुपिनचा मृतदेह युएईमध्ये विमानात आढळून आलेला. रुपिन हा आपल्या पत्नीसोबत हनिमूनवरुन परत येतानाच हा धक्कादायक प्रकार घडला ज्यात रुपिनचा मृत्यू झालेला.
आता या प्रकरणामधील इब्राहिम अझर आणि शाहीद अख्तर सय्यद हे दोघेच पाकिस्तानमध्ये जिवंत आहेत. यापैकी शाहीद हा आता कराचीमध्ये राहत नसून कायदा सुव्यवस्थेची दुरावस्था असणाऱ्या पाकिस्तानच्या ईशान्येकडील खैबर पख्तुवा प्रांतात राहतो. भारतीय विमानाचं अपहरण करणाऱ्या एका दहशतवाद्याचा नैसर्गिक मृत्यू झाला, दुसऱ्याचा भारतीय सुरक्षा दलांनी १३ डिसेंबर २०११ रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी खात्मा केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या बड्या नेत्यांनी जमाइलच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामधील बहावलपूरमध्ये जमाइलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मसूद अझर, ओमर सइद शेख हे दोघेही हरकत-उल-अनसर या गटासाठी काम करतात. तर काश्मीरी दहशतवादी असणाऱ्या मुस्ताक अहमद झारगर यालाही भारत सरकारने ३१ डिसेंबर १९९९ रोजी मुक्त केलं होतं. कंदाहार विमानतळावर या दोघांना सोडून देण्यात आलेलं. त्यावेळी कंदाहार तालिबानच्या ताब्यात होतं. भारताने सोडून दिल्यानंतर अझरने तालिबानचा प्रमुख मुल्ला ओमरची भेट घेतली आणि पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता.
यानंतरच मसूद अझरने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाची स्थापना केली आणि त्याने श्रीनगरमध्ये या गटाच्या माध्यमातून २००१ रोजी पहिला हल्ला केला आणि त्याच वर्षी १३ डिसेंबरला भारतीय संसदेवर हल्ला केला होता. त्याने २००५ साली रामजन्मभूमीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला. मात्र सुरक्षा यंत्रणांनी त्याचा हा डाव उधळून लावला. हा हल्ला झाला असता तर मोठी धार्मिक वाद देशात निर्माण झाला असता असं जाणाकर कारतात.