‘उत्तराखंड मुख्यमंत्री बचावकार्य निधी’मध्ये आयसीआयसीआय समूहातर्फे १५ कोटी रुपयांचे मदत देण्यात आली आहे.  आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे १५ कोटी रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
 चंदा कोचर म्हणाल्या, उत्तराखंडातील प्रलयात अडकलेल्यांचे कुटुंबीय आणि घरापासून दुरावलेल्या जनतेबद्दल मला सहानुभूती असून, मी त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. या प्रलयात अद्याप अडकलेल्या लोकांसाठी आणि उत्तराखंडमधील पुनर्बांधणी आणि पुनर्रचनेच्या कामासाठी देशभरातून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रबांधणीच्या कार्यात, गरजूंना मदत करण्यासाठीच्या केंद्रीय आणि राज्य शासनाच्या यंत्रणांना मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
 या देणगीत आयसीआयसीआय आणि तिच्या सलग्न कंपन्या तथा संस्थांबरोबर आयसीआयसीआय बँकेच्या कर्मचा-यांनी देखील योगदान दिले आहे.

Story img Loader