गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात करोनाच्या नव्या व्हेरिएंटनं भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. ओमायक्रॉन वेगाने जगभर पसरत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अद्याप ओमायक्रॉन जीवघेणा ठरल्याची कोणतीही माहिती आली नसल्यामुळे काहीसं दिलासादायक चित्र असलं, तरी देखील त्याचा वेगाने फैलाव होत असल्यामुळे सर्वच देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनविरोधातील लढ्यामध्ये एक नवं साधन आरोग्य यंत्रणेच्या हाती आलं आहे.

Omisure किटमुळे चाचण्या करणं अधिक सुलभ!

आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी टाट मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सतर्फे तयार करण्यात आलेल्या RT-PCR किटला मान्यता दिली आहे. Omisure असं या नव्या टेस्टिंग किटचं नाव आहे. ओमिश्यूअरमुळे आता जेनोम सिक्वेन्सिंगसाठी न पाठवता देखील ओमायक्रॉनच्या बाधेचं निदान करणं शक्य होणार आहे. ओमिश्यूअर आरटीपीसीआर किट आरोग्य यंत्रणेच्या हाती आल्यामुळे ओमायक्रॉनचं लवकरात लवकर निदान करून जास्तीत जास्त व्यक्तींच्या चाचण्या करणं शक्य होणार आहे.

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम

यासंदर्भात आयसीएमआरनं ३० डिसेबर २०२१ रोजी मंजुरीचं पत्र टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सच्या नावे जारी केलं आहे. यामध्ये, “उत्पादकाच्या निर्देशांनुसारच चाचण्या केल्या जात आहेत. यासाठी बॅचनुसार चचण्यांचं सातत्य राखण्याची जबाबदारी ही उत्पादकावरच असेल”, असं नमूद करण्यात आलं आहे.

लोकसत्ता विश्लेषण: ओमायक्रॉन कमी धोकादायक का? अभ्यासातून समोर आले निष्कर्ष

भारतात ओमायक्रॉनची मोठी रुग्णवाढ!

दरम्यान, भारतात मंगळवारी ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून आलं. आता भारतातील ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या १८९२ वर गेली आहे. यापैकी ७६६ रुग्ण पुन्हा निगेटिव्ह झाले आहेत. मात्र, यामुळे ओमायक्रॉन वेगाने देशात वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा सर्वाधिक ५६८ इतका आहे, तर दिल्लीमध्ये ३८२ ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. दुसरीकडे करोनाच्या रुग्णसंख्येत मंगळवारी तब्बल ३७ हजार ३७९ नव्या बाधितांची भर पडली आहे. १२४ रुग्णांचा गेल्या २४ तासांत करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट आता ३.२४ टक्क्यांच्या घरात आहे.

Story img Loader