दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्य़ात एका शाळेजवळ पेरण्यात आलेला एक आयईडी (इंप्रोव्हाइज्ड एक्स्प्लोजिव्ह डिव्हाइस) सुरक्षा दलांनी आज शोधून काढल्यानंतर पोलिसांनी तो निकामी केला. दहशतवाद्यांनी हा आयईडी कुलगाम जिल्ह्य़ातील महिपोरा खेडय़ातील एका शाळेजवळ रस्त्याशेजारी पेरून ठेवला होता. लष्कराच्या गस्तीपथकाच्या नजरेला तो पडल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या बॉम्बनाशक पथकाला सावध केले व त्यांनी कुठलेही नुकसान होऊ न देता हे स्फोटक निकामी केले.

Story img Loader