Parliament Security Breach: अमोलने जे काही केलं ते बेरोजगारीच्या कारणामुळे केलं. लष्करात भरती होण्यासाठी त्याने सहा ते सातवेळा प्रयत्न केले होते. त्याने धावण्याची स्पर्धाही जिंकली होती. आमचं दोन ते तीन दिवसात अमोल शिंदेशी बोलणं करुन द्या अन्यथा मी आत्महत्या करेन असा इशारा अमोल शिंदे या लातूरच्या तरुणाच्या वडिलांनी दिला आहे. अमोल शिंदे हा तरुण तोच आहे जो दिल्लीत संसद भवनाच्या बाहेर धूर पसरवून घोषणा देत होता. बुधवारी चार तरुणांनी संसदेत धूर पसरवून घोषणा दिल्या. त्यातले दोघे लोकसभेच्या आत गेले होते तर दोघेजण बाहेर होते. बाहेर असलेल्या दोघांमध्ये अमोलचा सहभाग होता. त्याला पोलिसांनी अटक केली असून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अमोल शिंदे हा लातूरचा आहे. त्याच्या वडिलांनी दोन ते तीन दिवसात आमचं अमोलशी बोलणं झालं नाही तर आत्महत्या करेन असा इशारा दिला आहे.
काय म्हटलं आहे अमोल शिंदेच्या आई वडिलांनी?
अमोलने दिल्लीला जाण्याआधी विहीर खोदण्याचं काम केलं. त्याचे त्याची त्याला पाच हजार रुपये मजुरी मिळाली. त्याने दोन हजार रुपये मित्राकडून उसने घेतले आणि त्यानंतर ९ तारखेला तो दिल्लीला गेला. त्याआधी त्याने दोन दिवस मजुरी केली होती. लातूरहूनच त्याने भगतसिंग यांचा फोटो घेतला होता आणि भगतसिंग यांचा फोटो असलेला टी शर्ट घेतला होता. तो घालूनच अमोल दिल्लीला गेला होता.
हे पण वाचा- Parliament security breach : कुणी महात्मा गांधींच्या विरोधात, कुणी कृष्णभक्त काय सांगतात आरोपींचे सोशल मीडिया प्रोफाईल?
..तर मी आत्महत्या करेन
आम्ही नवरा बायको दोघंही शेतमजुरी करतो आहोत. त्याला लागतील तेव्हा आम्ही पैसे दिले होते. त्याचं शिक्षणही कष्ट उपसून पूर्ण केलं. मात्र त्याला नोकरी लागत नव्हती. ज्या राज्यात लष्कराची भरती निघेल तिथे तो जात होता पण त्याला घेत नव्हते. असं अमोलचे वडील धनराज शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. अमोलशी माझं बोलणं करुन द्या अन्यथा मी आत्महत्या करेन असा इशाराही त्यांनी दिला आहे.
लोकसभेची सुरक्षा भेदून गदारोळ करणाऱ्या आणि धुराचे लोट पसरवणाऱ्या तरुणांमध्ये अमोल धनराज शिंदे याचाही समावेश आहे. हा तरुण लातूरचा आहे. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या झरी या गावात तो राहोत. अमोल शिंदेचे आई वडील मजुरी करतात. गेल्या अनेक दिवसांपासून तो पोलीस भरती किंवा लष्कर भरतीची तयारी करत होता. बुधवारी जेव्हा दिल्ली ही घटना घडली तेव्हा पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाने अमोलच्या लातूर येथील घराची झडती घेतली. त्याच्या कुटुंबियांची चौकशीही केली. आता माझ्या पोराशी माझं बोलणं करुन द्या अन्यथा मी आत्मत्या करेन असा इशारा त्याच्या वडिलांनी दिला आहे.
अमोल शिंदे याचे वडील गावातल्या खंडोबा मंदिरात झाडलोटही करण्याचं काम करतात. अमोलला दोन बाऊ आहेत त्यापैकी एक भाऊ फरशी फिटिंगचं काम करतो. अनेक प्रयत्न करुनही अमोलला नोकरी लागली नव्हती. अमोलचं शिक्षण गावातच झालं आहे. त्याचा स्वभाव शांत आहे आणि तो चांगला आहे असं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. त्यानं असं पाऊल का उचललं? या घटनेने त्याच्या घरातल्यांनाही धक्का बसला आहे. अमोललला व्यायामाची आणि धावण्याची आवड असणार अमोल रोज सकाळी सराव करत होता. धावणे, लांब उडी, उंच उडी यांचा सराव करत होता. गोळा फेक याचाही सराव करत होता. आई वडिलांनी त्याला व्याजी पैसे काढून साहित्य घेऊन दिलं होतं. भगतसिंग यांचा प्रभाव त्याच्यावर होता. पुस्तकंही वाचण्याची आवड त्याला आहे असंही त्याच्या आई वडिलांनी म्हटलं आहे.