पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल आणि अन्य नेत्यांविरुद्ध नोंदविण्यात आलेले फौजदारी खटले मागे घ्यावेत आणि या नेत्यांची मुक्तता करावी, अशी मागणी गुजरात काँग्रेसने केली आहे.

पटेल समाजातील युवकांविरुद्ध नोंदविण्यात आलेले खटले मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी निदर्शने करण्यात येतील, असा इशारा गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी दिला आहे. पटेल समाजाच्या नेत्यांवर भाजप सरकारने देशद्रोहासारखा आरोप ठेवला आहे, अनेक युवकांवर दंगल माजविण्याचे गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहात टाकले आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे.