सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायधीश उदय यू ललित यांनी इतर न्यायाधीशांच्या कामकाजाच्या वेळेवर कडक शब्दात टीका केली आहे. “जर मुलं ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायधीश सकाळी ९ वाजता कामाला सुरुवात का करू शकत नाहीत?” असा प्रश्न न्यायाधीश ललित यांनी विचारला आहे.

हेही वाचा- Mohammed Zubair : अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना जामीन मंजूर

वेळेच्या एक तास आगोदर कामकाजास सुरुवात
साधारण सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात होते आणि दुपारी चार वाजेपर्यंत न्यायलयाचे कामकाज चालते. तसेच दुपारी एक ते दोन अशी एक तासांची जेवणाची सुट्टीही न्यायधीश घेतात. मात्र, न्यायधीश उदय यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नियमित कामकाजाच्या वेळेच्या एक तास अगोदरच म्हणजे सकाळी ९.३० वाजता न्यायालयात दाखल होत सुनावणीस सुरुवात केली. त्यांच्या खंडपीठात न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचाही समावेश होता. न्यायाधीश ललित यांच्या या निर्णयाचे सगळीकडून कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा- …म्हणून एलॉन मस्क स्वत:च्या वडिलांशी बोलत नाही; एरोल मस्क यांच्याकडून धक्कादायक माहिती उघड

सकाळी ९ वाजता कामकाजास सुरुवात करा

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी सकाळी ९ वाजता कामकाजास सुरुवात करा. अडीच तासाने म्हणजे सकाळी ११.३० वाजता विश्रांती घेऊन १२ वाजता पुन्हा कामकाजास सुरुवात करा आणि दुपारी २ वाजेपर्यंत आपली कामे पूर्ण करा. म्हणजे सायंकाळी लांब पल्ल्याच्या सुनावणीसाठी जास्त वेळ मिळेल, असे मत न्यायाधीश उदय यू ललित यांनी केली आहे.

पुढच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी होणार विराजमान

न्यायमूर्ती उदय यू ललित पुढच्या महिन्यात २७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी विराजमान होणार आहेत. सध्याचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. २७ ऑगस्ट ते ८ नोहेंबर २०२२ पर्यंत त्यांचा सरन्यायधीशपदाचा कार्यकाळ असेल.

Story img Loader