जर मी तोंड उघडलं, तर अनेक लोकं अडचणीत येतील, अशी इशारा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सोमवारी दिला. गेल्या आठवड्यात संयुक्त जनता दलाने भारतीय जनता पक्षासोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोन्ही पक्षांतील नेत्यांचा एकमेकांवर चिखलफेक करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला असून, त्याचीच पुढची कडी म्हणजे नितीशकुमार यांनी भाजपच्या नेत्यांना दिलेला इशारा आहे.
पाटण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार यांनी जर मी माझे तोंड उघडले, तर अनेक लोकं अडचणीत येतील, असा सूचक इशारा भाजपला दिला.
काही दिवसांपूर्वी नितीशकुमार यांनी मोदी हे समाजात फूट पाडणारे नेते असल्याची टीका केली होती. त्याला भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी रविवारी पाटण्यामध्ये प्रत्युत्तर दिले. राजनाथसिंह यांनी मोदींवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर पुन्हा एकदा नितीशकुमार यांनी भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले.

Story img Loader