युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्री कुलेबा यांनी स्वस्त दरातील खनिज तेलाच्या आयातीवरून भारतावर नाराजी व्यक्त करत, हे नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. तसेच, “भारतासाठी स्वस्त दरात रशियाकडून तेल खरेदी करण्याची संधी याचीशी जुडलेली आहे की, युक्रेनी रशियन आक्रमणाचा सामना करत आहे आणि दररोज मरत आहेत. आमच्या वेदनांचा तुम्हाला फायदा होत असेल, तर तुम्ही आमची अधिक मदत केली पाहिजे.” असं दिमित्रींनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे.
कुलेबा सोमवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या या टिप्पणीवर प्रतिक्रिया देत होते, की या वर्षी फेब्रुवारी ते नोव्हेंबरपर्यंत यूरोपियन यूनियनने रशियाकडून जेवढे कच्चे तेल खरेदी केले आहे, तेवढे दहा देशांनी मिळून खरेदी केलेले नाही. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री म्हणाले की, यूरोपीय संघाकडे बोट दाखवून असं म्हणे पुरेसे होणार नाही की, ते सुद्धा हेच करत आहेत. कुलेबा यांच्या म्हणण्यानुसार, रशियाकडून स्वस्त दरातील खनिज तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाकडे युक्रेनच्या मानवी वेदनांच्या दृष्टीकोनात पाहायला हवं. विशेषकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे युद्ध संपवण्यासाठी एक मोठी भूमिका निभवावी लागेल.
भारताने रशियाकडून खनिज तेलाची आयात लक्षणीय प्रमाणात वाढवली आहे, तर दुसरीकडे आखातातून होणारी तेलाची आयात रोडावली आहे. भारताकडून होणाऱ्या तेल आयातीमध्ये इराकने अव्व्ल स्थान कायम राखले आहे तर रशिया सौदी अरेबियाला मागे टाकून दुसरा सर्वात मोठा खनिज तेल पुरवठादार ठरला आहे. चीननंतर भारत रशियाचा सर्वात मोठा तेल आयातदार बनला आहे.
चालू वर्षांत फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवरील केलेल्या आक्रमणामुळे काही पाश्चात्त्य देशांनी रशियातून तेल खरेदी टाळल्याने सवलतीच्या किमतींचा फायदा घेत भारत हा चीननंतर रशियाचा दुसरा सर्वात मोठा तेल खरेदीदार बनून पुढे आला आहे. सध्या रशियाकडून खनिज तेलावरील सवलत आता कमी झाली आहे. मात्र अजूनही मध्यपूर्वेतील देशांकडून आयात केल्या जाणाऱ्या किमतीची तुलना करता, रशियन तेल अजूनही स्वस्त आहे.