काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर ओडिशामधील काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवानंद रॉय यांनी तक्रार दाखल केली आहे. काँग्रेसने दावा केला आहे की, सोशल मीडियावरून सदर धमकी मिळाली आहे. “राहुल गांधी जर ओडिशात आले तर मला गोडसे व्हावे लागेल”, अशी धमकी मिळाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसची तक्रार सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष सरत पटनायक, प्रचार समितीचे अध्यक्ष भक्त चरण दास, प्रदेश सरचिटणीस आणि ओडिशाचे प्रभारी डॉ. अजय कुमार यांनी सायबर पोलिसांना तक्रारीचे पत्र देऊन यासंबंधी कारवाई करण्याची मागणी केली.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

‘मंत्रीपदासाठी बोगस फोन, माझ्या स्वाक्षरीचं खोटं पत्र येऊ शकतं’, मोदींनी सावधगिरीचा इशारा का दिला?

काँग्रेस नेत्यांनी पत्रात लिहिले की, भारत सिनेमा या एक्स हँडलवरून राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या हँडलने कॅप्शन लिहिले, “काँग्रेस ओडिशात कधीच येऊ शकत नाही. जर भविष्यात कधी राहुल गांधी ओडिशात आले तर मला नथुराम गोडसे व्हावे लागेल.” यापुढे राहुल गांधी यांच्या आयडीला टॅग करून समझे पप्पू, अशी धमकी देण्यात आली आहे.

ओडिशा काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले की, सदर हँडलवरून राहुल गांधी यांचे फोटोही जोडण्यात आले आहेत. यातून हे स्पष्ट होते की, सदर हँडलचा वापरकर्ता उघड उघड राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देत आहे. इतिहासात नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली होती. कट्टरतावादी विचारातून त्याने ही हत्या केली. त्याचप्रमाणे आता राहुल गांधी यांना धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की, याबाबत पोलिसांनी कडक कारवाई करावी.

सदर एक्स युजर आणि त्याच्या पोस्टची न्यायवैद्यकशास्त्र विभागातर्फे चौकशी करावी आणि आरोपीच्या विरोधात कडक कारवाई करण्याची विनंती काँग्रेसने केली आहे. ओडिशा शांतताप्रिय राज्य आहे. इथे अनेक पक्षांचे सरकार आले आणि गेले. पण या प्रकरणाची चौकशी व्हावी.

ओडिशामध्ये कमळ फुललं

ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २१ पैकी २० जागांवर विजय मिळविला. तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळू शकली. ओडिशात लोकसभेसह विधानसभेच्याही निवडणुका झाल्या. १४७ विधानसभा मतदारसंघापैकी भाजपाने सर्वाधिक ७८ जागा जिंकल्या, तर २० वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या बिजू जनता दलाला केवळ ५१ जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेस १४, सीपीआय(एम) १ आणि अपक्षांना ३ जागा मिळाल्या.

Story img Loader