टू जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात जर तत्कालिन दूरसंचारमंत्री ए. राजा दोषी असतील, तर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगही त्याला तितकेच जबाबदार नाही का, असा प्रश्न भाजपचे नेते आणि या प्रकरणी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामध्ये सिन्हा यांनी मनमोहनसिंग यांना संयुक्त संसदीय समितीपुढे येऊन आपली बाजू मांडण्याचे आवाहनही केले आहे.
पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतरच आपण टू जी स्पेक्ट्रम वाटपाबाबत निर्णय घेतल्याचे राजा यांनी संयुक्त संसदीय समितीला सांगितले होते. तोच धागा पकडून सिन्हा यांनी मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली. या संपूर्ण प्रकरणावर मनमोहनसिंग शांत आहेत, यावरूनच त्यांचा यातील सहभाग स्पष्ट होत असल्याचा आरोप सिन्हा यांनी केला.
मनमोहनसिंग यांनी संयुक्त संसदीय समितीपुढे येऊन आपली बाजू मांडण्याची वेळ आली नाही का, असाही प्रश्न सिन्हा यांनी लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.

Story img Loader