पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने जर दहशतवादाविरोधात गंभीरपणे लढा देण्याचे ठरवले असेल, तर त्यांनी सर्वप्रथम हाफीज सईद व दाऊद इब्राहिम यांना भारताच्या स्वाधीन करावे, असे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी सांगितले.
पेशावरमधील हल्ल्यानंतर शरीफ यांनी दहशतवादाविरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे व दहशतवादाचे समूळ नष्ट करण्याचे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना नायडू म्हणाले, ‘‘शरीफ हे खरोखरच दहशतवादाविरोधात लढणार असतील तर त्यांनी सईद व दाऊदला तात्काळ अटक करावी आणि भारताच्या स्वाधीन करावे, असे ते म्हणाले.

Story img Loader