आपल्या अनुपस्थितीमुळे सोनं सापडत नसल्याचा शोभन सरकार यांचा दावा
मुदत दिल्यास १० तासांत सोने शोधून दाखविण्याची तयारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘सुवर्ण स्वप्न’ मुळे भारतीय पुरातत्व खात्यास उत्खननाच्या उद्योगास लावणाऱ्या शोभन सरकार यांनी आजवर सोनं न सापडण्यामागे ‘वेगळेच’ कारण असल्याचा दावा केला आहे. उत्खननस्थळी आपल्याला उपस्थित राहू न दिल्याने सोनं सापडू शकलेले नाही, मात्र आपल्याला तेथे नेल्यास १० तासांच्या आत सोने सापडू शकेल, असा विश्वासपूर्ण दावा सरकार यांनी केल आहे. तसेच आपल्याला सोन्याबद्दल स्वप्नातून नव्हे तर ‘ध्यानधारणे’तून कळल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गुरुवारी पुरातत्व विभागाने एका उत्खनन क्षेत्राचे काम थांबवले. त्यावर शोभन यांनी येथे लष्कराची कुमक पाठवून द्यावी असे सांगत केवळ आपल्यालाच येथील सोन्याचा नेमका ठावठिकाणा ज्ञात असल्याचा दावा केला. तसेच आपल्या दाव्याप्रमाणे सोने सापडले तर, त्यातील ८० टक्के सोने भारतीय रिझव्‍‌र्ह बॅँकेकडे ठवण्यात यावे आणि उर्वरित २० टक्के देशाच्या विकासकामांसाठी वापरले जावे, अशी मागणी केली.