केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नाते दहशतवादाशी जोडले असून हे चुकीचे आहे. त्यांच्या वक्तव्यावरून असे वाटते की आम्ही सर्व दहशतवादी आहोत. केंद्र सरकारला असे वाटत असेल आणि त्यांच्यात हिंम्मत असेल तर त्यांनी संघ आणि भाजपवर बंदी घालून दाखवावी”, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताच्या ट्रांस हिडन येथे झालेल्या एका कार्यक्रमात म्हटले.  आज आपला देश अस्थिर परिस्थितीतून जात आहे, दहशतवादी एकामागून एक दहशतवादी घटना घडवत आहेत आणि तरी सुद्धा कोणतीही कारवाई मात्र होताना दिसत नाही. आज गरज आहे आपण सर्वांनी एकत्र येवून देशाची सुरक्षा करण्याची. ज्यापद्धतीचे वातावरण सध्या देशात आहे त्यातून देशाला भाजप पक्षचं उभारी आणून देऊ शकतो.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना राजनाथ सिंह म्हणाले की, “कर्नाटकात भाजप सरकार आपला कार्यकाळ उत्तमरित्या पूर्ण करेल, भाजप सरकारला कोणताही धोका नाही. आणि यावर माझी कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुद्धा झाली आहे.”       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा