जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये मागील पाच दिवसांपासून चकमक सुरू आहे. आतापर्यंत भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून इतर दोन दहशतवादी अद्याप गुहेत लपल्याची माहिती मिळत आहे. कोकेरनाग जंगल परिसरात ही चकमक सुरू आहे. येथील एका टेकडीच्या माथ्यावर असलेल्या गुहेत दहशतवादी लपून बसले आहेत.

या घडामोडीनंतर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून देशविरोधी घटकांना इशारा दिला आहे. भारताशी कुणी युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मुलं दुसऱ्यांना सांभाळावी लागतील, अशा शब्दांत राजीव चंद्रशेखर यांनी इशारा दिला आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Ramdas Athawale On Saif Ali Khan Attack
Ramdas Athawale : “मुंबई पोलिसांना सक्त सूचना…”, सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन
Delhi Schools Receive Bomb Threat
Bomb Threat : दिल्लीतील शाळांना बॉम्बची धमकी प्रकरणात मोठी माहिती समोर; १२ वीच्या विद्यार्थ्याला अटक, कारण ऐकून सर्वांनाच बसला धक्का
deadbodies founf in meerut
कुलूप असलेल्या घरात आढळले पाच मृतदेह, जोडप्याचा मृतदेह जमिनीवर, तर चिमुकल्यांचा बेडमध्ये; कुठे घडली भीषण घटना?

हेही वाचा- मोदी पुन्हा जिंकले नाहीत तर घुसखोरांचे राज्य : शहा

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, “भारताला अनेक शत्रू आहेत. या शत्रूंना भारताचा विकास रोखायचा आहे. पण त्यांना हे माहीत असलं पाहिजे की, भारतीय लष्कर हे एक ‘घातक मशीन’ आहे. त्यामुळे त्यांनी अशी कोणतीही चूक करू नये. हे तुम्ही टाळलं पाहिजे.”

हेही वाचा- ट्रेडमिलवर धावणाऱ्या तरुणाला मृत्यूने गाठलं; क्षणात सोडला जीव, धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

“हा नवा भारत आहे. हा भारत शत्रूंसमोर कधीच गुडघे टेकू शकत नाही. भारताने यापूर्वी अनेक युद्धे पाहिली आहेत. आम्हाला युद्ध नको आहे. पण तुम्ही भारताबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर, तुमची मुलं दुसऱ्यांना सांभाळावी लागतील, हे लक्षात ठेवा,” अशा शब्दांत राजीव चंद्रशेखर यांनी इशारा दिला आहे.

खरं तर, जम्मू काशमीरच्या अनंतनाग येथील कोकेरनाग जंगलात बुधवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. कोकरनागमध्ये दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर लष्कराच्या जवानांनी आणि स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम राबवली. तेव्हापासून चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. तर भारतीय लष्कराचे दोन जवानही शहीद झाले आहेत.

Story img Loader