IIM graduate Quits Rs 21 LPA Job In 10 Days: विविध क्षेतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीतील संघर्ष, ऑफिसमधील अनुभव आणि कामाच्या ठिकाणी असणाऱ्या चिंता व्यक्त करण्यासाठी रेडिट हे एक लोकप्रिय व्यासपीठ बनले आहे. गेल्या काही काळात अनेकांनी रेडिटच्या माध्यमातून गुप्तपणे त्यांचा कामाच्या ठिकाणचा संघर्ष आणि व्यथा मांडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता एका रेडिट युजरने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा (IIM) पदवीधर असलेल्या एका तरुणाने २१ लाखांची नोकरी का आणि कशी सोडली याचा मजेदार किस्सा सांगितला आहे. रेडिटवरील सस्पिसियस एअर १९९७ असे युजरनेम असलेल्या एका युजरने स्पष्ट केले की, तो जेव्हा इनसाईड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह होता तेव्हा त्याला एका नवीन अकाउंट एक्झिक्युटिव्हला प्रशिक्षण देण्यास सांगण्यात आले होते. जो आयआयएमच्या माजी विद्यार्थ्यी होता.

१० दिवसांतच सोडली नोकरी

या युजरने आपल्या पोस्टमध्ये म्हटेल आहे की, “प्रशिक्षणार्थी तरुणाचा पगार दरवर्षी सुमारे २१ लाख होता ज्यामध्ये २ लाख जॉइनिंग बोनसचा समावेश होता. पण, जास्त पगार असूनही, प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याने दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत कंपनी सोडली. नोकरी सोडण्याचा निर्णय का घेतला असे विचारले असता, प्रशिक्षणार्थी तरुणाने सांगितले की, त्याला वाटले होते की त्याला मार्केटिंग विभागात काम करण्याची संधी मिळेल. पण त्याला एक वर्षासाठी सेल्स विभागात काम करण्यास सांगितले गेले. यावर नाराज होऊन, त्याने नोकरीत रुजू झाल्यानंतर १० दिवसांतच नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.” ही नोकरी सोडल्यानंतर आयआयएमच्या पदवीधराला ऑपरेशन्स आणि सप्लाय विभागात १६ लाख रुपये पगाराची नोकरी मिळाल्याचेही युजरने स्पष्ट केले.

हे खूप निराश करणारे

रेडिटवर ही पोस्ट शेअर झाल्यापासून खूप व्हायरल झाली आहे. काही युजर्सनी आयआयएम पदवीधराला “अहंकारी” म्हटले, तर काहींनी त्याचा बचाव करत म्हटले की, कंपनीने नोकरीच्या पदाबद्दल अधिक पारदर्शक असायला हवे होते.

“आपण त्याला दोष देऊ शकतो का? मी मार्केटिंगच्या नावाखाली सेल्स विभागातील नोकऱ्यांसाठी मुलाखती घेताना पाहिले आहे”, असे एका युजरने म्हटले आहे. “हे लोक CAT देतात, इतर गर्विष्ठ लोकांचा २ वर्षे सामना करतात आणि नंतर जर तुम्ही त्यांना ग्राउंड लेव्हलला सेल्स विभागात काम करायला सांगितले तर त्यांना ते नक्कीच आवडणार नाही. हे खूप निराश करणारे आहे, काहींना ते आवडते, तर काहींना नाही”, असे दुसऱ्या युजरने म्हटले.