IIT Baba Ahay Singh : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे दर १२ वर्षांनी भरणारा महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे, ज्यामध्ये देशासह जगभरातील करोडो भाविक सहभागी होतात. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या यंदाच्या महाकुंभमेळातही जगभरातील भाविक सहभागी झाले आहेत. यामध्ये आयआयटी मुंबईचे एरोस्पेस अभियंता अभय सिंग यांचाही समावेश आहे, ज्यांनी वैज्ञानिक कारकीर्दतून अध्यात्मात येण्याचा निर्णय घेत कारकिर्दीत बदलली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोण आहेत आयआयटी बाबा अभय सिंग?

मूळचे हरियाणाचे असलेल्या अभय सिंग यांनी आयआयटी मुंबईतून अभियांत्रिकीची पदवी घेतली. शिक्षण सुरू असताना त्यांना तत्त्वज्ञानात रस निर्माण झाला आणि यातूनच त्यांनी प्लेटो, सॉक्रेटिस यांच्या कार्यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी आधुनिकतेचा शोध घेऊन जीवनाचे सखोल आकलन करण्याचा प्रयत्न केला.

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अभय सिंग यांनी डिझाइनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि फोटोग्राफीद्वारे त्यांनी त्यांचा छंदही जोपासला. त्यांची शैक्षणिक आणि कलात्मक कामगिरी दमदार असूनही, त्यांना जाणवले की, त्यांचे खरे ध्येय अध्यात्म आहे.

आयुष्यातील सर्वोत्तम टप्पा

नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत, अभय सिंग यांनी सांगितले की त्यांच्या अंतर्गत शोधामुळे त्यांना त्यांची वैज्ञानिक कारकीर्द सोडून एका भिक्षूचे जीवन स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. महाकुंभमेळा २०२५ मध्ये, अभय सिंग, यांना मसानी गोरख म्हणूनही ओळखले जाते. या प्रवासाचे वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे की, “हा टप्पा आयुष्यातील सर्वोत्तम टप्पा आहे.”

पत्रकारांशी अस्खलित इंग्रजीत संवाद साधण्याची त्यांची क्षमता पाहून महाकुंभमेळ्या त्यांच्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ते सोशल मीडियावर, सतत सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर, त्यांचे सुमारे ३६,००० फॉलोअर्स आहेत. त्यांच्या पोस्ट्स प्रामुख्याने ध्यान, योग आणि आध्यात्माबाबतच्या असतात. महाकुंभमेळ्यातील त्यांच्या अनुभवाबद्दल बोलताना, सिंग यांनी म्हटले की, “येथे अल्याने मनःशांती मिळाली आहे.”

१४४ वर्षांनी महाकुंभमेळा

यंदाचा महाकुंभमेळा विशेष आहे कारण तो १४४ वर्षांनंतर होत आहे. दर १२ वर्षांनी एक कुंभमेळा आयोजित केला जातो, परंतु १२ कुंभमेळ्यांनंतर (१२x१२=१४४ वर्षे) महाकुंभमेळा आयोजित केला जातो. महाकुंभाचे सर्वात खास आकर्षण म्हणजे शाही स्नान, जे विशेष ग्रहस्थितींमध्ये आयोजित केले जाते. यावेळी लाखो भाविक त्रिवेणी संगमात स्नान करतात आणि पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. महाकुंभ हा केवळ आध्यात्मिक सोहळा नसून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कामही करतो. येथे विविध संत, महात्मे आणि साधू एकत्र येऊन चिंतन आणि मनन करतात, ज्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक सौहार्दाची देवाणघेवाण होते.

Live Updates