भारतीय औद्योगिक संस्थेच्या (आयआयटी) पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणारे शुल्क ५० हजार रुपयांवरून ९० हजार रुपये करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या नव्या विद्यार्थ्यांना हे शुल्क आकारण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री एम. एम. पालम राजू यांनी दिली. देशातील सर्व आयआयटींच्या ४६व्या परिषदेत शुल्कवाढीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. आयआयटींचा दर्जा उंचावण्यासाठी या अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क दोन ते अडीच लाख रुपये करावे, अशी शिफारस काकोडकर समितीने केली होती. मात्र, आयआयटींचे संचालक आणि उच्चाधिकार कृती पथकाने शुल्क केवळ ४० हजारांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader